जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 22, 2026

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

 जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्याच दिवसाला विशेष स्वरूप देण्यासाठी गुलाबपुष्प, फुगे, चॉकलेट, पुस्तके, वह्या तसेच लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य गावचे माजी सरपंच श्री. महादेव (तात्या) मोरे यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी सरपंच श्री. महादेव (तात्या) मोरे, सरपंच हनुमंत भोसले, उपसरपंच धीरज लामकाने, पोलीस पाटील उज्वला मुसळे, अध्यक्ष दयानंद लांडे, मनोहर शेळके, गणेश गायकवाड, सोपान जगताप, शंकर जाधव, श्रीकृष्ण लांडे, पांडुरंग लांडे, नितीन माळी, गणेश येवले, गोपाळ झांबरे, केशव लामकाने, शिंगटे, बापू माने तसेच केंद्रप्रमुख शंकर थोरात, मुख्याध्यापक राजकुमार क्षीरसागर, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान आवताडे गुरुजी यांनी केले. तर तानाजी ढवळे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वसंत मुंडे गुरुजी व बाळू शिंदे गुरुजी यांचे विशेष सहकार्य लाभले.
नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा स्वागत सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन शाळेशी नाते अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages