आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 22, 2026

आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न

 आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न




 
नाशिक(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त’ योग वर्गाचे आयोजन करुन योग दिन साजरा करण्यात आला.
      विद्यापीठाच्या शैक्षणिक कक्षाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव यांनी संागितले की, व्यक्तिमत्त्व केवळ शारीरिक गुणांवर ठरत नसून मानसिक, बौद्धिक, भावनिक गुण महत्वाचे असतात. योग अभ्यासाने शारीरीक तसेच मानसिक आजारांपासुन संरक्षण होते. आरोग्यदायी आणि रोगमुक्त जीवनासाठी प्रत्येकाने योगाभ्यास व प्राणायम करावा.
विद्यापीठाच्या आयुष विभागाच्या प्रमुख डॉ. गीतांजली कार्ले यंानी सांगितले की, योग व प्राणायमामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्टया निरोगी राहण्यास मदत होते. योगामुळे शरीरातील स्नायू लवचीक होतात. मान, पाठ दुखीचे व्याधी कमी करण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने  योग अभ्यास लाभदायी आहे.
जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, नियमित योगाभ्यास केल्याने अनेक शारीरीक तसेच मानसिक फायदे होतात. आज जग वेगाने पुढे जात आहे पण या वेगात माणूस स्वतःलाच मागे टाकत आहे. शरीर थकते, मन भरकटते आणि आत्मा अस्वस्थ होतो. अशा वेळी योग हा केवळ व्यायाम राहत नाही, तर तो स्वतःकडे परत जाण्याचा एक शांत, सुंदर आणि सजग प्रवास बनतो असे त्यांनी सांगितले.
     विद्यापीठातील आयुष विभागातर्फे दि 15 ते 18 जून 2026 कालावधीमध्ये ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास 275 पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.    
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी प्रस्तावना केली. विद्यापीठातर्फे एक सप्ताहाचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. योग प्रशिक्षक श्री. मीना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दंडस्थितीतील आसने, बैठकस्थितीतील आसने, शयनस्थितीतील आसने घेण्यात आली तसेच डॉ. स्वाती जाधव यांनी कपालभाती व प्राणायाम आदी योगप्रकारातील क्रिया उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी करुन घेतल्या.

        विद्यापीठातील आधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांकरिता सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. कु. नेहा कातड, श्री संभाजी गायकवाड, श्रीमती ज्योती खांडे यांनी सदर स्पर्धेमधे पारितोषिके पटकावली. डॉ प्रदीप आवळे, डॉ ज्योती गवळी यांनी परिक्षण केले. डॉ. अनुश्री नेटके, मेघा बोरसे, सागर कुलकर्णी, आदेश सांगळे, लोकेश गांगुर्डे यांनी यांनी कार्यक्रमाकरीता परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग वर्गात विद्यार्थी व शिक्षक, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages