श्री. शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 22, 2026

श्री. शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

श्री. शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!


टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- श्री. शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये सर्वांच्या उपस्थितीत १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची जनजागृती करण्यासाठी एका विशिष्ट थीमवर हा दिवस साजरा केला जातो. ज्याची थीम “निरोगी वृद्धत्वासाठी योग” (Yoga for Healthy Ageing) अशी आहे. 
या थीमचा अर्थ अगदी सोपा आहे, योगाच्या माध्यमातून आपण केवळ दीर्घायुष्यच नव्हे, तर निरोगी आणि सुदृढ जीवनही जगू शकतो.
 या दिवसाला अत्यंत मोठे महत्त्व देखील आहे. खरं तर योग हा भारताने जगाला दिलेला अमूल्य वारसा आहे. निरोगी शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी योगा खूप महत्त्वाचा असतो. यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच हाडे मजबूत होण्यास मदत होते. मुळात म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्त्वाचे आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, लवचिकता वाढते, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे शरीर, मन आणि श्वासोच्छवासाचे संतुलन साधून आजारांपासून दूर ठेवण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. क्रीडाशिक्षक आबासाहेब राऊत व रोहित काळे यांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला यामध्ये सूर्यनमस्कार, वृक्षासन, ध्यान, वज्रासन, अनुलोम-विलोम कपालभाती इत्यादी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेली योग पूर्ण केले. प्राचार्य  डॉ. प्रशांत होमकर यांनी सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले. शाळेचे उपप्राचार्य शरद दादर  व शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते. या कार्यक्रमास श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काका देशमुख, सचिव हर्षवर्धन दादा देशमुख, संचालक सूरज भैय्या देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारी संचालिका प्रियंका देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages