लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सरकाळे, प्रा . सायली बडेकर ,प्रा. वर्षा मानेदेशमुख हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रीकांत ढेरे व रुद्राक्ष साखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध युद्धप्रसंग व महाराजांनी या युद्धात दाखविलेले बुद्धिचातुर्य व संयम याविषयी मनोगत व्यक्त केले. प्रा. आशिष सरकाळे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, कार्य यांविषयी सांगताना त्यांच्याकडून आपण उत्तम नियोजन, दूरदृष्टी, नम्रपणा, समाजाप्रती त्याग या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका यादव यांनी व आभार साक्षी झगडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages