प्रा. डॉ सुनीलकुमार पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

प्रा. डॉ सुनीलकुमार पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

 प्रा. डॉ सुनीलकुमार पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान


 



सातारा (कटूसत्य वृत्त):- ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौंसिल विद्यापीठने अंबोली (सावंतवाडी, सिंधुदुर्ग) येथे आयोजित केलेल्या पदवी वितरण समारंभात पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ .सुनीलकुमार पाटील यांना गोव्याचे मा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण (Engineering and Technology) क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी (Ph D) प्रदान करण्यात आली. सदर प्रसंगी ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौंसिल चे कुलगुरू डॉ आचार्य जगदीश सो, प्रमुख पाहुणे अरविंद परिशेट्टी, डॉ अनिलराव कुराडे, संचालिका सौ संगीता पाटील, प्राचार्य सुजित पाटील व मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच भावी आयुष्या साठी शुभेच्या दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages