थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना, पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा- सभापती काकडे.* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना, पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा- सभापती काकडे.*

 थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना, पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा- सभापती काकडे.




हवेली(कटूसत्य वृत्त):-तालुक्यातील थेऊर, नायगाव, व हिंगणगाव (AG) कृषी फिडर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना पूर्वीप्रमाणेच दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती  युवराज हिरामण काकडे यांनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या या फिडरअंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा करण्यात येत असल्याने सिंचनासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. रात्री शेतात जाऊन मोटारी सुरू करणे, पाणी व्यवस्थापन करणे यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढल्याने हल्ल्याची भीती बदली आहे. तसेच अन्य अनेक समस्यांना शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी या भागातील गावांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे आणि सिंचनाचे नियोजन सुलभपणे करता येत होते. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने दिवसा वीजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही काकडे यांनी म्हटले आहे.

थेऊर, नायगाव व हिंगणगाव AG फिडर अखत्यारीतील सर्व गावांना पूर्वीप्रमाणे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी, महावितरण प्रशासनाने तातडीने आवश्यकती कार्यवाही करावी, अशी मागणी सभापती युवराज काकडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages