संत नामदेव शिंपी समाजातर्फे भाविकांना महाप्रसाद वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

संत नामदेव शिंपी समाजातर्फे भाविकांना महाप्रसाद वाटप

 संत नामदेव शिंपी समाजातर्फे भाविकांना महाप्रसाद वाटप



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- येथील श्रीसंत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने पंढरीत आलेल्या भाविकांना खिचडी व जिलेबी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
अधिक महिन्याचे औचित्य साधून समाज वर्गणीतून राबविण्यात आलेल्या या महाप्रसादाचे वाटप चौफाळा येथे करण्यात आले. प्रारंभी संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज ह.प.भ. केशव महाराज नामदास यांच्या हस्ते विठ्ठल व संत नामदेव महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून महानैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप सुरु करण्यात आले. यावेळी पंढरपूर मर्चंन्ट बँकेचे संचालक आदित्य फत्तेपुरकर, अभयसिंह कुलकर्णी-इचगावकर, पंढरपूर शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव विलास पोरे, विश्वस्त राजेश धोकटे सर, संजय चांडोले, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भावलेकर गुरुजी, दत्तप्रसाद निपाणकर, उध्दव लटके, जयवंत कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद लटके, वाघेश म्हैंदरकर, सुनिल भावलेकर, शिवकुमार भावलेकर, प्रकाश मेटकर, प्रसाद निकते, पांडूरंग गणबोटे, शशिकांत बुरांडे, आकाश जवंजाळ, दत्ता चांडोले, सचिन बुरांडे, प्रशांत काकडे, आप्पा बंगाळे, अनिल धट सर, निलेश धोकटे, सतीश निपाणकर, अनिकेत उंडाळे, संजय निपाणकर, संकेत उंडाळे, विष्णू पोरे, राजू म्हैंदरकर, नितीन जवंजाळ, अ‍ॅड. विनायक उंडाळे, देवीदास बोधे, समर्थ जवंजाळ, संजय उंडाळे, गौरव बंगाळे, पुकाळे (खर्डी), माऊली निकते, रत्नाकर पिसे, राजू नायकू, अमोल राऊत, सचिन लटके, रामचंद्र गुरव, बालाजी गुरव, अभिनव व्हटकर यांच्यासह शिंपी समाज बांधव व युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages