पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

 पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांना मिरवणूक काढून उत्साहात शाळेत आणण्यात आले



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोखरापूर येथे आज शाळेचा पहिला दिवस नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. इयत्ता पहिलीतील लहानग्यांचे स्वागत एका अनोख्या उपक्रमाने करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांना सजवलेल्या बगीतून मिरवणूक काढून शाळेत आणण्यात आले. शाळेच्या वतीने शिक्षक व गावातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे कुंकवाच्या पाण्यात पाऊल भिजवून कोऱ्या कागदावर ठसे उमटविण्यात आले व ती आठवण पालकांना देण्यात आली.ग्रामस्थ सतपाल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ड्रेस, बूट व पुस्तके वाटप केली.

 उपशिक्षणाधिकारी भागवत सांगळे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संस्कार व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापक महादेव विटेकर यांनी पालक, मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. विशेषतः शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मच्छिंद्र नाना दळवे यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरोटे, सदस्य राजकुमार दळवे, शाळा समिती अध्यक्षा श्रीमती दिपाली डोंगरे, उपाध्यक्षा समीना शेख, उपसरपंच आशिष आगलावे, तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिल्या दिवसाला संस्मरणीय बनविणारा ठरला असून गावकऱ्यांच्या सहभागामुळे शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages