कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी; - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी;

 कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी;

लेखी आश्वासनानंतर आंदोलन माग



 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथील वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले. महावितरण प्रशासनाने रात्री ६ ते पहाटे ४ या वेळेत कायमस्वरूपी सिंगल फेज वीजपुरवठा देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वीराज माने, संजय डोके, बाळासाहेब डोके, राजेंद्र केदार, अशोक लांडगे यांच्यासह ग्रामस्थ दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने मागण्यांची दखल घेत लेखी आश्वासन दिले.
    टेंभुर्णी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील आणि पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
     यावेळी नवनाथ शिंदे, सोसायटीचे संचालक मारुती काशीद, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम, सुरेश पाटील, नानासाहेब माने, महेश माने, रमेश डोके, माजी सरपंच दशरथ चव्हाण, उत्तम पाटील, जालिंदर डोके, संपत चव्हाण, बिभीषण शिंदे, कांतीलाल शिंदे, भारत चोपडे, अनिल डोके, सौरभ डोके, देविदास मोरे, जालिंदर केदार, सुधीर मोरे, कृष्णदेव केदार, रामलिंग केदार, ईश्वर शिंदे, बाळासाहेब माने, सुनिल मोरे, विलास डोके, मंगेश ताटे, बंडू माने, नवनाथ ताटे, मारुती डोके, महादेव पाटील, नामदेव डोके, सोमनाथ डोके, दिनकर डोके, ऋषिकेश हांडे, अरुण भरगंडे, ज्योतीराम शिंदे, विठ्ठल केदार, बापू डोके, वैभव डोके, विजय भरगंडे, विष्णू मोरे, जोतीराम कांबळे, संजय शिंदे, नाना नलवडे, विजय मोरे, अशोक लांडगे, हनुमंत डोके, अण्णासाहेब मोरे, दत्ता मोरे, प्रवीण डोके, पप्पू मोरे, बापुराव डोके, शंभू शिंदे, लखन शिंदे, तुषार काशीद, आणि शिवतेज डोके उपस्थित होते.
तसेच संभाजी ब्रिगेडचे सचिन खुळे, नामदेव चिंतामण, शिवाजी नवले आणि महेंद्र सोनवणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

चौकट : दोन दिवसांच्या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याने कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानत दिलेले आश्वासन तातडीने आणि कायमस्वरूपी अंमलात आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages