'मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने -"कलबुर्गी -सोलापूर- मनमाड- नागपूर " द्विसाप्ताहिक एक्सप्रेस सुरु करावी - प्रवासी सेवा संघाची मागणी ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

'मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने -"कलबुर्गी -सोलापूर- मनमाड- नागपूर " द्विसाप्ताहिक एक्सप्रेस सुरु करावी - प्रवासी सेवा संघाची मागणी !

'मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने -"कलबुर्गी -सोलापूर- मनमाड- नागपूर " द्विसाप्ताहिक एक्सप्रेस सुरु करावी - प्रवासी सेवा संघाची मागणी !



 मध्य रेल्वे - सोलापूर रेल्वे विभागाचे - वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक [Sr. DOM ] मा. श्री . योगेश पाटील साहेब यांना - "कलबुर्गी - सोलापूर - मनमाड -नागपूर" (द्विसाप्ताहिक) -रेल्वे सुरू करणेबाबतचे निवेदन सादर करतांना - प्रवासी सेवा संघ सोलापूर संघटनेचे पदाधिकारी संजय पाटील (अध्यक्ष ) संजय चौगुले (सचिव ) नंदू दळवी (कोषाध्यक्ष ) व प्रविण शहापूरकर ..

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे स्टेशनहून नागपूर विभागाकडे एकही थेटची रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची व भाविकांचे सध्या खूपच गैरसोय होत आहे .याकरिता  सोलापूर रेल्वे विभागातून नागपूर विभागाकडे जाणारी थेटची रेल्वे सोलापूर रेल्वे प्रशासनाने सुरू करावी अशी मागणी प्रवासी पर्यटक व भाविकाकडून करण्यात येत आहे . सदरची रेल्वे सुरू करावी याबाबतचे निवेदन प्रवासी सेवा संघ सोलापूर यांनी सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक मा.श्री योगेश पाटील यांना सादर केलेले आहे .

 सदरची रेल्वे सेवा कलबुर्गी येथून सुरू केल्यास गाणगापूर तसेच अक्कलकोट येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे . शिवाय कलबुर्गी - सोलापूर - दौंड या रेल्वे मार्गावरील प्रवाशांना शिर्डी येथे जाण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशन तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्टेशन शिवाय शेगाव येथे जाण्यासाठी प्रवासी व भाविकांना एक ही थेटची रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने  नाविलाजास्तव रस्ते वाहतुकीचा वापर करून अनेक

गैरसोयींना सामोरे जाऊन प्रवासी व भाविकांना  प्रवास करावा लागत आहे . यामुळे सोलापूर रेल्वे विभागातील प्रवासी व भाविकांच्या प्रवास कालावधीत वाढ होऊन वेळ व आर्थिक बाबीवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे . शिवाय वयोवृद्ध आजारी तसेच कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी व भाविक वर्गास अनेक समस्यांना सामोरे जाऊन नागपूर विभागाकडे जीव धोक्यात घालून उपलब्ध असलेल्या इतर प्रवासी साधनांचा वापर करावा लागत आहे .

सोलापूर विभागातील प्रवासी व भाविकांची दीर्घकालीन मागणी विचारात घेऊन प्रत्येक गुरुवार व रविवार सायंकाळी 4:30 वाजता कलबुर्गी येथून नागपूरकडे व परतीच्या प्रवासा करीताप्रत्येक शुक्रवार व सोमवार नागपूर येथून सायंकाळी 4:30 वाजता सोलापूर मार्गे कलबुर्गी कडे साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी सुरू करावी .या विशेष एक्सप्रेस गाडीस गाणगापूर रोड दुधनी अक्कलकोट रोड होटगी सोलापूर मोहोळ माढा कुर्डूवाडी केम जेऊर केत्तूर भिगवन दौंड अहिल्यानगर बेलापूर कोपरगाव मनमाड चाळीसगाव भुसावळ शेगाव अकोला बडनेरा वर्धा व अजनी असे प्रवासी थांबे मंजूर केल्यास प्रवासी व भाविकांकडून  या विशेष रेल्वे गाडीस  मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रतिसाद मिळून रेल्वेच्या महसुलात वाढ होणार आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages