सोलापूरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

सोलापूरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल

 सोलापूरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील मार्केंडेय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र स्टेट जूनियर अँड सब जूनियर अक्वेटिक चैम्पियनशिप २०२६, डाइविंग ही स्पर्धा दि. ३० व ३१ मे दरम्यान पार पडली. या स्स्पर्धेत सोलापुर च्या श्रावणी सूर्यवंशी हीने  १ मीटर स्प्रिंगबोर्ड, ३ मीटर स्प्रिंगबोर्ड, हाईबोर्ड मध्ये अनुक्रमे २४६.८५, २९३.२५, ३०४.४० गुणासह ३ गोल्ड मेडल आपल्या नावावर केली आहेत.  तसेच दि. २३ व २४ मे २०२६ रोजी मुंबई येथिल गोरेगांव स्पोर्ट्स क्लब येथे पार पड़लेल्या महाराष्ट्र स्टैट सिनियर एक्वाटिक चैम्पियनशिप २०२६  स्पर्धेत सोलापुरचे प्रतिनिधित्व करताना ३ मीटर स्प्रिंगबोर्ड व हाईबोर्ड मध्ये अनुक्रमे १५१.३० व १८२.०५ गुणासह २ गोल्ड मेडल पटकावले आहेत.  याप्रमाणे यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी ने सोलापुर चे प्रतिनिधित्व करताना ५ गोल्ड मेडल ची कमाई केली आहे. 

श्रावणीने आजवर डायव्हींग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशन च्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत -

राज्य पातळीवर  30 गोल्ड, 6 सिल्वर,  1 बाँझ‍
राष्ट्रीय पातळीवर  20 गोल्ड, 5 सिल्वर, 2 बाँझ,
आतंरराष्ट्रीय  २ गोल्ड,   4  सिल्वर,  2 बाँझ
 
एकूण - 52 गोल्ड ,  15 सिल्वर,  5 ब्राँझ

याप्रमाणे तिने एकूण 72 पदके वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages