कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा नवा उत्साह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा नवा उत्साह

 कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा नवा उत्साह




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी  विद्यालयात सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी शाळेचा पहिला दिवस म्हणून संस्थेचे संस्थापक कै. पंचप्पा कल्याणशेट्टी व शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक मराठी, कन्नड व सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व मुलांना संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, संस्थेच्या शिक्षण विभाग प्रमुख सौ रूपाली शहा,  विज्ञान विभाग प्रमुख सौ पूनम कोकळगी यांनी औक्षण केले. त्यानंतर गुलाबपुष्प व चिक्की, चॉकलेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व आनंदात शाळेत प्रवेश केला. यावेळी शासनाकडून आलेले पाठ्यपुस्तक सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
 यावेळी संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप आदी मराठी, कन्नड, सेमी विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

चौकट-
शाळेचा पहिला दिवस म्हणून संपूर्ण शाळा सजवले होते. गेटवर सुंदर रांगोळी, दर्शनी  भागात रंगीबेरंगी फुगे लावले होते. सेल्फी पॉईंट मधून विद्यार्थी फोटो काढत होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद दिसून आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages