कुमठे प्रशालेमध्ये प्रवेशोत्सव साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

कुमठे प्रशालेमध्ये प्रवेशोत्सव साजरा

 कुमठे प्रशालेमध्ये प्रवेशोत्सव साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कुमठे,सोलापूर येथे आज दिनांक 15 जून 2026 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक संजय जाधव यांच्या हस्ते  करून सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले तसेच नूतन पर्यवेक्षक विजयसिंह क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्वीकारला. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड माजी पर्यवेक्षक वसंत गुंगे राष्ट्र विकास प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुश्री जमखंडीकर उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages