करमाळा मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अल्ताफशेठ तांबोळी; मिरवणूक प्रमुखपदी सोहेल पठाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 13, 2026

करमाळा मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अल्ताफशेठ तांबोळी; मिरवणूक प्रमुखपदी सोहेल पठाण

  करमाळा मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अल्ताफशेठ तांबोळी; मिरवणूक प्रमुखपदी सोहेल पठाण

करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा शहर व तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहरम उत्सव समितीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांची तर मिरवणूक प्रमुखपदी पैलवान सोहेल पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नालबंद मंगल कार्यालय येथे करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष शौकतभाई नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अमीरशेठ तांबोळी, जाकीर वस्ताद, जाफर घोडके, पैलवान इमरान वस्ताद, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, नालसाहेब दर्ग्याचे मुजावर अलीम खान, राजू सय्यद, इस्माईल सय्यद, पैलवान सलमान घोडके, सारंग परदेशी, पप्पू सय्यद, अमर शेख, बिलाल कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या बैठकीत मोठ्या संख्येने मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवला. करमाळ्यातील मोहरम उत्सव हा अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून कायद्याचे पालन व संविधानाच्या चौकटीत राहून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे हा उत्सव सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
मोहरम उत्सवाची सुरुवात दि. 17 जून रोजी होणार असून या दिवशी भुईकोट किल्ल्यात मानाची नालसाहेब सवारी स्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध सवाऱ्यांची स्थापना होईल. सर्व सवाऱ्यांचे विसर्जन दि. 26 जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजांच्या सवाऱ्या आणि डोल्यांचा सहभाग. यात रजपूत समाजाची सुतार तालीम सवारी, लिंगायत समाजाची माहुले यांची सवारी, कुंभार समाजाची सवारी, रंभापूर येथील दुधाट यांची सवारी तसेच चिवटे यांचा डोला आदींचा समावेश असतो. त्यामुळे मोहरम उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरतो.
उत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी बैठकीत विविध नियोजन करण्यात आले. बैठकीस सुफरान शेख, भैय्या परदेशी, केतन परदेशी, फारुख कुरेशी, इरफान सय्यद, निहाल शेख, युसुफ शेख, अख्तर शेख, जावेद शेख, समीर शेख, शाहरुख नालबंद, सलीम मदारी, सादिक सय्यद, जावेद झारेकरी, दिलावर मुलाणी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
◼️ चौकट
"हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे मोहरम सण" – शौकतभाई नालबंद
"करमाळा शहरातील मोहरम सण हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. गेली अनेक वर्षे दोन्ही समाजातील बांधव खांद्याला खांदा लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मानाची नालसाहेब सवारी पाहण्यासाठी मुस्लिमांसह हिंदू बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. विविध समाजांच्या सवाऱ्या आणि डोल्यांमुळे हा उत्सव सामाजिक सलोख्याचे उदाहरण बनला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम उत्सव शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा आमचा निर्धार आहे," असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा मोहरम उत्सवाचे मुख्य आयोजक शौकतभाई नालबंद यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages