मोहोळच्या शाहीर राजाराम वाघमारे यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित
अंकोली(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार मोहोळच्या प्रसिद्ध शाहीर राजाराम वाघमारे यांना नुकताच समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मोहोळ येथील कलगीतुरा भेदी गाण्याचे प्रसिद्ध शाहीर राजाराम वाघमारे यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार वडगाव (सांगली) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार अशोकराव माने, महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे, सुप्रसिद्ध रिल स्टार मनीषा हजारे,रवी सूर्यवंशी (दाजी), तमाशा सम्राट नितीन बनसोडे(कर्वडीकर), अमल महाडिक,समर्जितशिंह घाडगे, सम्राट महाडिक, आनंद हावळे, बाळासाहेब गारे, देवदास भंडारे व महाराष्ट्रातील नामांकित कलाकार उपस्थित होते. वाघमारे यांच्या या यशाबद्दल मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, शाहीर परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार फाटे, रिलस्टार चंद्रकांत फाटे यांनी त्यांचे कौतुक केले.

No comments:
Post a Comment