स्कूल बसची २० टक्के दरवाढ; सर्वसामान्य पालकांवर आर्थिक बोजा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

स्कूल बसची २० टक्के दरवाढ; सर्वसामान्य पालकांवर आर्थिक बोजा

 स्कूल बसची २० टक्के दरवाढ; सर्वसामान्य पालकांवर आर्थिक बोजा




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोलापूरकर पालकांना आणखी एका आर्थिक भाराला सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींसह वाहन देखभाल खर्चात झालेल्या वाढीमुळे स्कूल बस चालकांनी यंदा सरासरी २० टक्के भाडेवाढ लागू केली आहे. या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला वर्षाकाठी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फटका बसण्याची शक्यता आहे.

महागाईच्या झळा सहन करत असताना नागरिकांना मुलांच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. शाळांची फी, गणवेश, शैक्षणिक साहित्य, ट्युशन फी आणि इतर खर्चामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता स्कूल बसच्या शुल्कवाढीची भर पडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित आणखी बिघडणार आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे १,५०० स्कूल बस व रिक्षांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. याशिवाय नोंदणी नसलेल्या स्कूल व्हॅन आणि रिक्षांची संख्याही लक्षणीय आहे. यापूर्वी एका विद्यार्थ्याकडून दरमहा १,००० ते १,५०० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र २० टक्के वाढीनंतर हे शुल्क १,२०० ते १,८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हजारो पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

दरवाढीमागील प्रमुख कारणे

इंधन दरवाढ : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत.
वाहन देखभाल खर्च : सुटे भाग, विमा, कर, परवाने आणि चालकांच्या वेतनात वाढ झाली आहे.
सुरक्षा उपाययोजना : सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली आणि इतर सुरक्षा उपकरणे बसविणे अनिवार्य करण्यात आल्याने खर्च वाढला आहे.

शहर व जिल्ह्यातील १,५०० हून अधिक स्कूल बस आणि रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. या वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक वाहनधारकांनी फिटनेस चाचणी पूर्ण केली असली तरी काही चालकांनी अद्याप ती केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे का, याची खातरजमा करण्यासाठी आरटीओ विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages