मुद्रा सन सिटी येथील नागरिकांच्या नाला समस्येची महापौरांनी घेतली दखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 6, 2026

मुद्रा सन सिटी येथील नागरिकांच्या नाला समस्येची महापौरांनी घेतली दखल

 मुद्रा सन सिटी येथील नागरिकांच्या नाला समस्येची महापौरांनी घेतली दखल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट रोड येथील मुद्रा सन सिटी परिसरातील रहिवाशांनी नव्याने प्रस्तावित करण्यात येणारा ओपन नाला बंदिस्त स्वरूपात करण्यात यावा, या मागणीसंदर्भात दिलेल्या निवेदनाची आज महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दखल घेतली.
यावेळी महापौर कोंड्याल यांनी संबंधित परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रहिवाशांनी पूर्वी ओपन नाल्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी, आरोग्यविषयक समस्या तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली.
नागरिकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी महानगरपालिका आयुक्तांशी  चर्चा करून . सदर नाला बंदिस्त स्वरूपात कशा प्रकारे करता येईल, याबाबत तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर नियोजन करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
महापौरांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या विषयाचा सकारात्मक विचार करण्यात येईल तसेच संबंधित विभागाकडून आवश्यक अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी नगरसेवक प्रथमेश दादा कोठे, माजी नगरसेवक राजकुमार हांचाटे उपअभियंता प्रकाश दिवाणजी तसेच मुद्रा सन सिटी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages