कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार बार्शी पोलिसांच्या जाळ्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार बार्शी पोलिसांच्या जाळ्यात

 कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार बार्शी पोलिसांच्या जाळ्यात




बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी शहर व तालुका परिसरात कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणे, शेतकरी व व्यावसायिकांना धमकावणे, मारहाण करणे, जमीन-जुमला बळकावण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणे अशा गंभीर प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) याला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 171/2026 दाखल करण्यात आला होता. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अवघ्या काही तासांतच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला जेरबंद केले.
पोलीस माहितीनुसार, संजय आरगडे याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे तब्बल 10 गुन्हे दाखल असून त्याला पूर्वी तडीपारदेखील करण्यात आले होते.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दहशत माजवणारे, महिलांना त्रास देणारे, अवैध व्यवसाय करणारे व सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने व त्यांच्या पथकाने केली.
पोलीसांचे आवाहन :
सदर आरोपी किंवा त्याच्या साथीदारांकडून यापूर्वी कोणाला त्रास झाला असल्यास अथवा त्यांच्याविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी न घाबरता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages