स्व.अजितदादा पवार यांच्या 5 व्या मासिकानिमित्त गरजू मुलींना सायकल व वह्यांचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

स्व.अजितदादा पवार यांच्या 5 व्या मासिकानिमित्त गरजू मुलींना सायकल व वह्यांचे वाटप

 स्व.अजितदादा पवार यांच्या 5 व्या मासिकानिमित्त गरजू मुलींना सायकल व वह्यांचे वाटप

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते व कार्यकर्त्यांना सहकार्य करून त्यांच्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांतून नेता बनविणारे नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहिले जात होते. पण नियतीपुढे आपले काही चालत नाही दादा आपल्यातून अचानक गेले.आज अजितदादा जावून 5 महिने पूर्ण झाले असून त्यांच्या 5 व्या मासिकानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने सामाजिक बांधीलकी जपत गरीब व गरजू मुलींना सायकल व 1 हजार वह्यांचे वाटप पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याहस्ते व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत विद्यालय पंढरपूर येथे करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संजय बंदपट्टे, निखिल परचंडे, गणेश भाऊ आधटराव, विजय अभंगराव, बाबा चव्हाण, दत्ता भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद, दिलीप कोरके, अमोल परबतराव, सारंग महामुनी, युवराज मुचलंबे, प्रदीप तांदळे, पंकज पवार, विकी अभंगराव, ऋषिकेश रायबान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की, अजितदादा यांच्या जाण्याने राज्याचे खूप मोठं नुकसान झाले असून ते कधी हि भरून न निघणारी पोकळी असून दादांचे सामाजिक कार्य जिवंत ठेवणे हिच दादांना श्रद्धांजली ठरेल, असे विचार व्यक्त केले.
युवा नेते प्रणव परिचारक यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ज्या प्रकारे काम करत असून त्यांचा आदर्श राज्याने घ्यावा कारण नेत्याच्या प्रति असलेले प्रेम, दर मासिक दिवशी काही ना काही सामाजिक उपक्रम घेऊन श्रद्धांजली अर्पण केली जाते आज दादा आपल्यात नाहीत हें अजून हि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे.  आजपर्यंत पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील डिव्हाडर मध्ये वृक्षारोपण, असेल जेष्ठ नागरिक यांना वाचनालय, बालकाश्रम येथे अन्नदान, आज गरजू मुलींना सायकल अन्‌ वही वाटप असे कार्यक्रम साजरे करत असताना आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेम आणि त्यांनी घालून दिलेली शिकवण जपणारे कार्यकर्ता घडले पाहिजेत असे प्रणव परिचारक यांनी मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages