सेवासदन प्रशालेत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

सेवासदन प्रशालेत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 सेवासदन प्रशालेत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) यांच्या वतीने सेवासदन प्रशालेत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विशेषतः लाठी प्रशिक्षणावर भर देण्यात आला असून तब्बल तीस मुलींनी यात सहभाग घेतला.

शिबिरात सहभागी विद्यार्थिनींना शरीराच्या विविध भागांवर प्रभावी प्रहार करण्याचे तंत्र शिकवण्यात आले. तसेच अचानक हल्ला झाल्यास स्वतःचा बचाव कसा करावा, लाठी द्वंद्व कसे करावे याचेही प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक विवेक मिस्कीन आणि स्वाती कानगुडे यांनी अवघ्या सात दिवसांत विद्यार्थिनींकडून प्रभावी प्रात्यक्षिके तयार करून घेतली.

१ मे रोजी आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात विद्यार्थिनींनी लाठी प्रशिक्षणाची दमदार प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पतकी, मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे, शिवस्मारकच्या संचालिका माधवी कुलकर्णी तसेच व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.

यावेळी माधवी कुलकर्णी यांनी शिवस्मारकतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका रुपाली पवार यांनी केले.

चौकट

शिवस्मारकतर्फे विविध शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिवकालीन युद्धकलेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक शाळांनी शिवस्मारकाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages