लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादरीकरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादरीकरण

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादरीकरण



 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. या सादरीकरणासाठी पर्यवेक्षक म्हणून प्रा. ए. डी. पाटील  (प्राचार्य, कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय मदडगाव) व प्रा . जी. एम. काळुंगे (प्रकल्प समन्वयक,  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मदडगाव) हे लाभले होते. डॉ.  ए. डी. पाटील  यांचे स्वागत लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन यांच्या हस्ते व प्रा. जी एम काळुंगे यांचे स्वागत प्रा. आशिष सरकाळे यांच्या हस्ते पुष्गुच्छ देऊन करण्यात आले. या प्रकल्प सादरीकरणात विद्यार्थ्यांनी कृषीजैवतंत्रज्ञान व एन्टरप्रिन्युरशीप डेव्हलपमेंट इन बायोटेक्नॉलॉजी अंतर्गत विविध विषयांवर त्यांचे प्रकल्प सादर केले. प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने विविध पिकांचे टिश्यू कल्चर, सूक्ष्मजीवशास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकीय विविधता व पिकांचे संकर ओळखणे आदींचा समावेश होता. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने लिंबू, ऊस, केळी, पेरू, बांबू, डाळिंब, जरबेरा, सिंगोनियम, साग, गहू, कांदा, मकाआदी पिकांचा समावेश होता. विद्यार्थांना कृषी जैवतंत्रज्ञान क्षेत्रात ऊती संवर्धन व सूक्ष्मजीवशास्त्राचा वापर करुन पिकांमध्ये संशोधन कशाप्रकारे केले जाते, पिकांची जैविविधता कशाप्रकारे तपासली जाते, त्याचा वापर कशाप्रकारे पिकांच्या विविध जाती विकसित करण्यासाठी केला जातो याविषयी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांद्वारे अनुभवता आले. या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. सायली बडेकर यांनी व सूत्रसंचालन सावरी बिराजदार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यायाचे प्राचार्य सागर महाजन, प्रा. सायली बडेकर, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. अपूर्वा पिस्के तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages