सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन व श्रद्धांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन व श्रद्धांजली

 सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन व श्रद्धांजली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट समोर जाहीर निषेध आंदोलन व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या आंदोलनात विविध पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “नसरापूरच्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. या अमानुष घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या काळात साडेतीन वर्षांची चिमुकलीदेखील सुरक्षित नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. वासनेने पिसाळलेल्या नराधमांविरुद्ध समाजात तीव्र रोष आहे. अशा आरोपींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायपरंपरेप्रमाणे तातडीने चौरंग शिक्षा व्हावी, अशी जनतेची भावना आहे. अशा कठोर शिक्षेमुळेच गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब निर्माण होईल.”
महिलांवरील अत्याचार, विनयभंग, अँसिड हल्ले आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी राज्यात तातडीने शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली. “शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अत्याचाराच्या प्रकरणांतील आरोपींना अल्पावधीत कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी हा कायदा तातडीने लागू करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
नरोटे यांनी न्यायप्रक्रियेतील विलंबावरही भाष्य केले. “सततच्या तारखा आणि विलंबामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले. आंदोलनादरम्यान नसरापूर येथील चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चेतनभाऊ नरोटे यांनी यावेळी केली.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, महिला अध्यक्षा नगरसेवक नरसिंह आसादे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, दिनेश म्हेत्रे, परशुराम सतारेवाले, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, गिरीधर थोरात, सागर उबाळे, सुनील सारंगी, सचिन पवार, मोहसीन फुलारी, भीमराव शिंदे, चंद्रकांत टिक्के, संजय कुराडे, दशरथ सामल, सचिन सुरवसे, जितराज गरड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages