नागेश करजगी ऑर्किड ज्युनियर कॉलेज चे एच एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एच एस सी बोर्ड फेब्रुवारी २०२६ परीक्षेमध्ये नागेश करजगी ऑर्किड ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन केले श्रेया संजय मसाळ हिने ८५.५०% घेऊन प्रथम क्रमांक मिळविला, रौनक निर्भय राज याने ८५.१७% घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला, तसेच गौरांग गणेश मामड्याल ८२.८३%, स्नेहा सुर्यकांत गांगडे ८२ %, आर्यन दीपक सुरवसे ८१.३३%,जिया सुमीत कांकरिया ८१%, शुभम राजू आडम ८०.६७%, अर्शप्रीती मधुकर ओव्हाळ ८०%, तेजस्वी शिवराज मोने ८०% यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी कॉलेजचा निकाल १००% लागला.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी, सचिवा सौ वर्षा विभूते, व्यवस्थापक श्री अक्षय चिडगुंपी, कॉलेजच्या प्राचार्य सौ स्मिता कुलकर्णी शाळेच्या प्राचार्या सौ रुपाली हजारे, शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे यांनी अभिनंदन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment