क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सोलापूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह अशोक नगर, विजापूर रोड सोलापूर हे मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहे. सदर वसतीगृहात प्रवेशित विदयार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, खेळाचे साहित्य, वातानुकुलित संगणक कक्ष, सी.सी. टिव्ही कॅमेरे, शुध्द पिण्याचे पाणी, २४ तास सुरक्षारक्षक इ सोयी-सुविधा मोफत पुरवल्या जातात.
सदर वसतीगृहामध्ये शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, खुला, अपंग, अनाथ प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृहातील रिक्त जागेवर इयत्ता ८ वी पासून ते उच्य/व्यावसायिक शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्याना वसतीगृहाच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने विदयार्थ्याकडून प्रवेश अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी वेवसाईट - https://hmas.mahait.org
अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहाशी संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह अशोक नगर, विजापुर रोड, सोलापूर जि सोलापूर यांनी केले आहे.
शासकीय वस्तीगृह प्रवेश वेळापत्रक पुढीलप्रमाणे
*शालेय विद्यार्थी वस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज करावयाचा दि.- 30 मे 2026 पर्यंत- प्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक 07 जुलै 2026
* इयत्ता अकरावी बारावीवस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज करावयाचा दि.- 15 जुलै 2026 पर्यंतप्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक 31 जुलै 2026
* बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम- वस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज करावयाचा दिनांक 15 जुलै2926 , प्रवेश प्रक्रिया अंतिम करावयाचा दिनांक 31 जुलै २०२६
No comments:
Post a Comment