पहिल्या लग्नाची माहिती लपवली, दागिने-रोखीसह नववधू फरार
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील बावची येथे विवाहाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्या पतीपासून मुलगी असल्याची माहिती लपवून दुसरे लग्न लावून दिल्यानंतर नवविवाहित महिला तीन महिन्यांतच घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसांत दाखल झाली आहे.
फिर्यादी नामदेव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेसोबत लग्न जमवून देण्यासाठी तब्बल ₹१.५० लाखांची रक्कम देण्यात आली होती. लग्नानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू असतानाच महिलेने आपल्या पहिल्या विवाहाची आणि त्या विवाहातून एक मुलगी असल्याची माहिती लपविल्याचे उघड झाले.
दरम्यान, संबंधित महिला घरातील दीड तोड्याचे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे पलायन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी नववधूसह लग्न जमवून देणाऱ्या तिघांविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment