विराट स्पोर्ट्स करिअर अकॅडमीच्यावतीने नूतन पोलिसांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 22, 2026

विराट स्पोर्ट्स करिअर अकॅडमीच्यावतीने नूतन पोलिसांचा सत्कार

 विराट स्पोर्ट्स करिअर अकॅडमीच्यावतीने नूतन पोलिसांचा सत्कार


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नेहरूनगर येथील विराट स्पोर्ट्स करिअर अकॅडमी यांच्यावतीने आज गुरुवार दि.21 मे 2026 रोजी नूतन पोलीसांचा सत्कार उत्साहात संपन्न झाला.
 यावेळी प्रमुख अतिथी माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, क्रीडा मार्गदर्शक सुभाष माने, उद्योजक सतीश बुरुडकर, समाज कल्याण अधिकारी शांताराम शिंदे यांच्या शुभहस्ते शाल, फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
 पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले योगेश्वर पांचाळ, युवराज गवळी व हरिश गंगदे तसेच पोलीस शिपाई म्हणून भरती झालेले सोहेल मुल्ला, साहिल शेख, अल्ताफ सय्यद, अमरनाथ गोटे, श्रीनिवास धायगुडे यांचा वरील मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी भीमाशंकर म्हेत्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 तसेच क्रीडा मार्गदर्शक सुभाष माने यांनी अकॅडमीच्या कार्याचे कौतुक केले.
 जॉगर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष कदम, न्यू जॉगर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कदम, सोलापूर जॉगर्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत जाधव,.रेल्वे अधिकारी निलेश वरवडकर,भाजप क्रीडा प्रकोष्ट यशवंत पाथरूट, क्रीडा पत्रकार अजित संगवे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू सूर्याजी लिंगडे व अकॅडमीच्या संचालिका व मुख्य प्रशिक्षक भारती लिंगडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित खेळाडू व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अतिशय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बहुसंख्य प्रशिक्षणार्थी व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages