लाडकी बहीण योजनेचे केवायसी प्रक्रिया बंद, अफवांवर विश्वास ठेवू नये - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 22, 2026

लाडकी बहीण योजनेचे केवायसी प्रक्रिया बंद, अफवांवर विश्वास ठेवू नये

 लाडकी बहीण योजनेचे केवायसी प्रक्रिया बंद, अफवांवर विश्वास ठेवू नये


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे सुरू असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना भेट घेऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन परिस्थिती जाणून घेतली तरी नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवून या कार्यालयात गर्दी करू नये असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आले.
सात रस्ता येतील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होऊन या ठिकाणी शहर व तालुक्यातील असंख्य महिला गर्दी करीत होत्या त्याचबरोबर तेथील झेरॉक्स दुकानदार तीन रुपये चा केवायसी फॉर्म 25 रुपयाला विक्री करताना आढळून आले प्रत्यक्षात त्या कार्यालयामध्ये दोन पोर्टल सुरू असून त्या पोर्टलवर केवायसी केले आहे का हे चेक करण्याचे काम सुरू आहे शासनाने अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल किंवा सरकारी नोकरदार असेल ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे व एकाच घरातील फक्त दोन महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याचे दाखवत आहे हे सुद्धा तेथे चेक करून सांगण्यात येत होते
जिल्हा महिला व बालकल्याण समिती कार्यालय सात रस्त्याला एका सोसायटीमध्ये भाड्याने असून ते नागरिकांच्या गैरसोयीचा आहे त्यामुळे हे कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हलवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या
 वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात येणार आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अन कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मीनलताई दास जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी उत्तर तालुका प्रमुख विक्रम वानकर जिल्हा संघटक विशाल साळुंखे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages