अनगरच्या पाटील विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनीची मुंबई पोलीसपदी निवड
अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु. तेजस्विनी बाबूराव वसेकर हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल विद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके यांच्यासह रमेश चव्हाण, सत्यवान कांबळे, उज्वला घोलप, माधवी पाचपुंड, अनुपमा वरवटकर, ज्योती भडकवाड, दाजी गुंड, पांडुरंग शिंदे, सत्यवान दाढे, बापूराव घुले, डॉ. प्रशांत कुलकर्णी, सोमनाथ ढोले आणि झाकीर मुलानी उपस्थित होते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. तेजस्विनी वसेकर हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला आहे. तिच्या यशामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment