आत्मा अंतर्गत आयोजित "भरडधान्य (मिलेट) लागवड" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 27, 2026

आत्मा अंतर्गत आयोजित "भरडधान्य (मिलेट) लागवड"

 आत्मा अंतर्गत आयोजित "भरडधान्य (मिलेट) लागवड"

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये सोलापूर जिल्हयातील शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, भरडधान्य (मिलेट) हे कमी खर्चात, मातीची सुपीकता वाढवते, हवामान बदलास तग धरणारी पिके तसेच शाश्वत शेतीसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये भगर, नाचणी व राळा या पीकांचे क्षेत्रात वाढ करणेसाठी निवडलेल्या शेतक-यांना मोफत प्रशिक्षण व बियाणे दिले जाणार आहे तसेच पिकवलेल्या मालाची खरेदी व विक्रीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहभाग घेवू शकतात.
तरी वरील प्रमाणे इच्छुकांनी प्रकल्प संचालक, आत्मा सोलापूर या कार्यालयातील  विक्रम फुटाणे मोबा क्रं. ९४२३२३२५६९ यांचेशी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील (BTM) तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, (ATM) सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन मागणी अर्ज सादर करावा. मागणी अर्जामध्ये पुढील मुद्यांचा समावेश असावा. १. शेतक-यांचे नांव, गांव व तालुका, २. मोबाईल क्रमांक, ३. एकुण क्षेत्र, ४ मिलेट अंतर्गत पेरणी करावयाचे क्षेत्र व पीक, ५. त्यासाठी आवश्यक बियाणे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages