विधानपरिषद निवडणूक, नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीचे वेळापत्रक जाहीर
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक १८ मे २०२६ अन्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार आदर्श आचारसंहिता दिनांक १८ मे २०२६ पासून लागू करण्यात आलेली आहे.
सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक २५ मे २०२६ ते ०१ जून २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये दिनांक २८ मे रोजी बकरी ईद व दिनांक ३१ मे रोजी रविवारची सार्वजनिक सुट्टी असल्याने हे दोन दिवस वगळून दिनांक २५, २६, २७, २९, ३० मे तसेच ०१ जून रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी सर्व संबंधितांना वरील वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment