जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रम
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या पुढाकाराने २९ मे रोजी हा कार्यक्रम पार पडला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश कोपुरवाड तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षिरसागर, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ, दंत शल्यचिकित्सक डॉ. सुवर्णा राठोड, मेट्रन श्रीमती विजयमाला बेले तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे समन्वयक अनिल गुंजे उपस्थित होते.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्येथीम : “Unmasking the appeal: Countering nicotine & tobacco addiction” म्हणजेच “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला प्रतिकार करूया”.आरोग्य तपासणी : जिल्हाधिकारी कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मौखिक आरोग्य तपासणी व समुपदेशन सत्र.
सांस्कृतिक उपक्रम : बासरी व तबला वादनाद्वारे Music Therapy चे प्रात्यक्षिक सुमीत घाडगे व रत्नदिप वारगड यांनी सादर केले. स्पर्धा : स्वाक्षरी मोहिम व पोस्टर स्पर्धा आयोजित. मनोगत : तंबाखू मुक्ती केंद्राच्या मदतीने व्यसन सोडलेल्या रुग्णांनी अनुभव कथन केले.प्रमुख संदेश.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या असंसर्गजन्य आजारांची माहिती दिली व तंबाखू मुक्ती केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अमित महाडिक व श्रीमती मंजूश्री मुळे यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस.बी. दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रोहन वायचळ यांनी केले.

No comments:
Post a Comment