सय्यद जलालुद्दीन बुखारी बाबा यांच्या ऊरूसाला आज पासून सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कंबर तलाव समोरील सय्यद जलालुद्दीन बुखारी बाबा यांच्या ४४८ व्या ऊरूसाला आज शनिवार पासून सुरुवात होणार आहे.
त्याप्रमाणे आज ३० मे रोजी सायंकाळी परचम कुशाई होणार आहे, ३१ मे रोजी रात्री साडे आठ नंतर संदल काढण्यात येणार आहे. १ जुन रोजी संध्याकाळी साडेसहा नंतर चिरागा - फातेहा खानीचे आयोजन करण्यात आले आहे. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी असर नमाज नंतर जीआरत केली जाणार असल्याची माहिती सय्यद बुखारी दर्गाह ट्रस्टचे सचिव हाजी हारुन हाजी इब्राहिम शेख यांनी दिली आहे. तरी जास्तीत जास्त भक्त भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन दर्गाह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment