अरणच्या यशोदा गुरुकुलला बेस्ट प्री स्कूल ऑफ द ईयर पुरस्कार! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

अरणच्या यशोदा गुरुकुलला बेस्ट प्री स्कूल ऑफ द ईयर पुरस्कार!

 अरणच्या यशोदा गुरुकुलला बेस्ट प्री स्कूल ऑफ द ईयर पुरस्कार!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुंबई येथे संपन्न झालेल्या ३३ व्या भारतीय शिक्षण परिषदेमध्ये जिजाऊ महिला मंडळ तीर्थक्षेत्र अरण (तालुका माढा, जिल्हा सोलापूर) संचलित यशोदा गुरुकुल अरण या शाळेला *बेस्ट प्री स्कूल ऑफ द ईयर* हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या शिवानी पंजाबी यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा सुनीता रणदिवे व यशोदा गुरुकुलचे मार्गदर्शक हरिदास रणदिवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

२०२५-२६ ह्या शैक्षणिक वर्षात नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजी या विभागामध्ये यशोदा गुरुकुल मध्ये आयोजित केलेले विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या माता पालकांसाठी आयोजित केलेले विविध उपक्रम, प्रशस्त क्रीडांगण, पर्यावरण पूरक इमारत व विविध प्रजातींच्या वृक्षांची केलेली लागवड व जोपासना विद्यार्थ्यांची झालेली सर्वांगीण प्रगती याचा आढावा घेऊन हा पुरस्कार यशोदा गुरुकुलला प्रदान करण्यात आला आहे.
    या पुरस्काराबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजीत पाटील, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी यशोदा गुरुकुलचे विश्वस्त, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व सेवकांचे अभिनंदन केले आहे.
        राष्ट्रीय पातळीवरील आयोजित केलेल्या या शिक्षण परिषदेमध्ये देशातील शिक्षण पद्धती, नवीन तंत्रज्ञान, परीक्षा पद्धती व नवीन शैक्षणिक धोरणांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण हे पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये कशी रुजावावीत  यावर चर्चा झाली. देशभरातील उत्कृष्ट शाळा, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील नवोदीत शिक्षण संस्था या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या . यावेळी उत्कृष्ट शाळा, शिक्षक व संस्था यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages