पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील राजमाता अहिल्यादेवी मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील नियोजन बैठक नुकतीच पार पडली.

अहिल्यादेवी जयंती स्थापना कार्यक्रम शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, उत्सव अध्यक्षा मनीषा माने, अशोक तरंगे, श्रीशैल मामा हत्तुरे आणि उत्सव अध्यक्ष अजयकुमार देवकते यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दि. २९, ३० आणि ३१ मे दरम्यान अहिल्यादेवी मातेचे पूजन व दुग्धाभिषेक विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. दि. ३० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचे पुस्तक आणि रोपांचे वाटप केले जाणार आहे.

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अहिल्यादेवी पुतळा परिसर, सोलापूर येथे पार पडणार आहे.

दरम्यान, धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाची भूमिकाही स्पष्ट करण्यात आली. उपोषण, मोर्चे आणि निवेदनांच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या पत्रकार परिषदेस विजय देवकते, अर्चना बंडगर, धनंजय कारंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages