मुलांमधील मधुमेहाचे लवकर निदान करण्यावर भर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

मुलांमधील मधुमेहाचे लवकर निदान करण्यावर भर

 मुलांमधील मधुमेहाचे लवकर निदान करण्यावर भर


 शाळा-अंगणवाड्यांमध्ये तपासणी होणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशात वाढत्या बालमधुमेहाच्या समस्येची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बालमधुमेहाच्या निदान, उपचार आणि देखरेखीबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

या निर्णयामुळे देशातील लाखो मुलांना वेळेवर आणि मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.नवीन मार्गदर्शक तत्त्वे जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तयार करण्यात आली असून, बालमधुमेहाचे लवकर निदान करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. अनेकदा मुलांमधील मधुमेहाची लक्षणे वेळेत ओळखली जात नसल्याने आजार गंभीर अवस्थेत पोहोचतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी शाळा, अंगणवाडी आणि समुदाय स्तरावर नियमित आरोग्य तपासणी करण्याची योजना आखण्यात आली आहे.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर बालमधुमेह हा चिंतेचा विषय बनत असल्याने केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुलांमध्ये वेळेत तपासणी करून मधुमेहाचे निदान करणे, आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे आणि सातत्याने देखरेख ठेवणे यावर भर दिला जाणार आहे.सरकारच्या या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना समान पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, बालमधुमेहामुळे उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंती टाळण्यासही हातभार लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages