छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसकडून अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०४ व्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे व जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, राजू अलकोड लतिफ शेख माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव, मुमताज तांबोळी ज्योती गायकवाड उपाध्यक्ष भिमराव शिंदे शिवाजी साळुंखे धैर्यशील बाबरे अभिलाष अच्युगटला, यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment