श्वान ‘मॅक्स’चा सेवापूर्ती सन्मान तर ‘इरा’चे पोलीस दलात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

श्वान ‘मॅक्स’चा सेवापूर्ती सन्मान तर ‘इरा’चे पोलीस दलात स्वागत

 श्वान ‘मॅक्स’चा सेवापूर्ती सन्मान तर ‘इरा’चे पोलीस दलात स्वागत



 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकातील कार्यरत ‘मॅक्स’ या श्वानाचा सेवापूर्ती सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मॅक्सला यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मानवंदना देत सन्मानित करण्यात आले.

गुन्हे शोध मोहीम, स्फोटकांचा शोध तसेच अमली पदार्थांविरोधातील कारवायांमध्ये मॅक्सने मोलाची भूमिका बजावत पोलीस दलाच्या अनेक कारवाया यशस्वी करण्यात मदत केली. सतर्कता, निष्ठा आणि धाडसामुळे मॅक्स पोलीस दलाचा विश्वासू साथीदार ठरला.

याचवेळी पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या ‘इरा’ या श्वानाचे स्वागतही उत्साहात करण्यात आले. भविष्यात इराही पोलीस दलाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावेल तर यावेळी सेवापूर्ती व स्वागत सोहळ्यास पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि श्वान पथकातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages