सोलापूरच्या विकासाच्या प्रमुख प्रश्नांवर पालकमंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

सोलापूरच्या विकासाच्या प्रमुख प्रश्नांवर पालकमंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक होणार

 सोलापूरच्या विकासाच्या प्रमुख प्रश्नांवर पालकमंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक होणार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर  आज शासकीय विश्रामगृह मध्ये प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या मान्यवर सदस्यांचे उपस्थित पार पडलेल्या बैठकीत एकमताने पालकमंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शहरातील मूलभूत सुविधा, वाहतूक, पायाभूत विकास, नागरी नियोजन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल.

बैठकीत सर्वप्रथम सोलापूर शहरातील दररोज होणारा पाणीपुरवठा व त्यासंदर्भातील नवीन निविदांबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ५४ मीटर रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून CNS हॉस्पिटल ते सोरगाव या दुसऱ्या टप्प्यातील कामाला त्वरित सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली.

सोलापूरसाठी प्रस्तावित आयटी पार्क प्रकल्पाबाबत नेमकी कोणती प्रगती झाली आहे, याची अधिकृत माहिती देण्याची मागणी उपस्थितांनी केली. शहरातील महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या दयनीय अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

जुळे सोलापूर भागाचा झपाट्याने वाढणारा विस्तार लक्षात घेता त्या भागासाठी स्वतंत्र महापालिका व विशेष प्राधिकरण तातडीने स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सोलापूर शहर व हद्दवाढ भागामध्ये मैदान, सभागृह, बाग-बगीचे व सार्वजनिक मनोरंजन सुविधांबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची बाब उपस्थित करण्यात आली.

सोलापुरातील जुन्या एन.जी.मिल परिसरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज अद्यावत बसस्थानक उभारण्याची मागणी देखील बैठकीत करण्यात आली. जुळे सोलापूरमधील कबर तलाव व डी-मार्ट परिसरातील पुलांच्या रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर आणि स्पष्ट धोरण राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व योजना, प्रकल्प व विकासकामांसाठी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर पारदर्शकपणे मांडण्याची मागणी करण्यात आली.

या बैठकीस मिलिंद भोसले, विजय कुंदन जाधव, योगीन गुर्जर, आनंद पाटील, सुहास भोसले, मनोज क्षीरसागर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, प्रसन्न नाझरे, सुभाष हिराप्पा माशाळे, आदित्य विशाल पाटील, राजु बिराजदार, प्रदीप नाईक, राहुल मेहता पुगल, गणेश विठ्ठल शिंदे, दत्तू मिसाळ, वासुदेव अडके, नरेंद्र भोसले, संतोष कांबळे, अमृता अकुलजकर, धनश्याम दायमा, सागर कडू, योगीनाथ व्ही. खानापुरे, अजय बिराजदार, अमरसिद्ध कोरे, प्रकाश भुतडा, प्रशांत बी. भोसले, चारुदत्त भुजंग, डॉ. श्रीकांत अजुंटगी, महेश लांडे, प्रा. सुरेश कन्ने, भरत पाटील, प्रदीप शेट्टी, लौकीक शाह, रघु पाटील, सुनील महाकाळ माळी, हर्षल बाळासाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages