कोंडी गावात जनगणना सहसंचालक रमेश भोसले यांची अचानक पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 22, 2026

कोंडी गावात जनगणना सहसंचालक रमेश भोसले यांची अचानक पाहणी

 कोंडी गावात जनगणना सहसंचालक रमेश भोसले यांची अचानक पाहणी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशभरात १६ मे ते १५ जून दरम्यान सुरू असलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरयादी गणनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जनगणना कार्यालय मुंबईचे सहसंचालक रमेश भोसले यांनी रविवारी दुपारी कोंडी गावाला अचानक भेट दिली. यावेळी सांख्यिकी अधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी अजित भांड हेही उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी प्रगणकांना वाटप करण्यात आलेल्या भागांची पाहणी केली तसेच घरांवर क्रमांक टाकण्याची प्रक्रिया आणि जनगणना मोबाईल ॲपची माहिती प्रत्यक्ष तपासली. त्यांनी काही घरांना भेट देत प्रगणकांना आवश्यक मार्गदर्शनही केले.

यावेळी सहसंचालक रमेश भोसले यांनी जनगणनेसाठी वापरण्यात येणारे ‘एचएलओ’ मोबाईल ॲप पुढील दोन दिवसांत अपडेट होणार असून, त्यामध्ये स्वगणना केलेल्या नागरिकांची माहितीही उपलब्ध होईल, अशी माहिती दिली. भर उन्हात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणनेचे काम जबाबदारीने पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.

उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात १४५ प्रगणक आणि २४ पर्यवेक्षक जनगणनेचे काम करत आहेत.

यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक लतिफ तांबोळी, शिवाजी भोसले, कोंडी गावचे प्रगणक ज्ञानेश्वर लांबतुरे, दीपक मोरे, अळगी, पुष्पा कांबळे मॅडम आणि शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उदय कोढांरे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages