छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे अभिवादन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 व्या जयंतीनिमित्त, अकलूज येथील सदभाऊ चौकामध्ये, छत्रपती प्रतिष्ठान माळशिरस तालुका यांच्यावतीने, विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती प्रतिष्ठान माळशिरस तालुका यांच्यावतीने, गेली दहा वर्षे झाले, शिवजयंती व संभाजी महाराज जयंती निमित्त वायफळ खर्च टाळून,विविध सामाजिक उपक्रम आयोजित करुन जयंती साजरी केली जाते.
ज्या मराठा सेवकाने सलग 3 दिवस मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अन्नत्याग करत आमरण उपोषण अकलूज येथे केले होते. त्याच मराठा सेवकाने यावर्षी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त, मनोज जरांगे पाटील यांचा माळशिरस तालुक्यातील मराठा सेवक, आशुभाऊ ढवळे यांच्या आयोजनातुन व जनतेच्या सहकार्यातून हे उपक्रम पार पडले.छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजिक उपक्रम राबवण्याचे छत्रपती प्रतिष्ठानचे हे 11 वर्षे आहे.यावर्षी 369 व्या जयंतीनिमित्त सदभाऊ चौक येथे संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमास माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील,अनंत चव्हाण-पाटील,सचिन शिंदे आदीनी भेट देवुन स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी सदाशिवराव माने विद्यालयातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजाच्या जिवनपटाची माहीती दर्शविणाऱ्या 369 पुस्तकांचे वाटप करण्यात आले.तसेच मिष्टान्न भोजन व 1000 भगव्या गमजाचे वाटप करण्यात आले.
महापुरुषांच्या जयंतीला वायफट खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवल्याची दखल घेवुन विविध संस्थानी आशुभाऊ ढवळे यांना तीन पुरस्कार दिलेले आहेत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशुभाऊ ढवळे(छत्रपती प्रतिष्ठान)रविंद्र माने,शारदाताई चव्हाण,अरुधती हजारें, अमित सावंत,सचिन चव्हाण,सुशांत माने,रमजान तांबोळी, रेखा महेश माने,दिनेश पाटील, नाजीर बागवान,ओंकार कांबळे,गणेश कदम,दिगंबर वाघोले,आनंद लोंढे पाटील,निलेश चव्हाण यांनी परीश्रम घेऊन उपक्रम पार पडला.
.png)
No comments:
Post a Comment