जनसेवा संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी दिपक पिंजारे यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

जनसेवा संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी दिपक पिंजारे यांची निवड

 जनसेवा संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी दिपक पिंजारे यांची निवड




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी पंढरपूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे दिपक पिंजारे यांची निवड करण्यात आली आहे.
            धवलनगर येथील प्रतापगडावर महाराष्ट्र जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते दिपक पिंजारे यांना महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड झालेले नियुक्तीपत्र देवून फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
          दिपक पिंजारे यांनी अनेक वर्ष जनसेवा संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यांनी विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. जनसेवेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि एक विश्वासू सहकारी म्हणून दिपक पिंजारे यांची ओळख असून त्यांचा या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेले कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील राजकीय,सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages