दहावीच्या परीक्षेत जयहिंद विद्यालयाचे देदीप्यमान यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

दहावीच्या परीक्षेत जयहिंद विद्यालयाचे देदीप्यमान यश

 दहावीच्या परीक्षेत जयहिंद विद्यालयाचे देदीप्यमान यश






कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे (ता.जि.धाराशिव) या विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल ९१.२२% लागला आहे.
या परीक्षेत विद्यालयातील पवार श्रद्धा संतोष हिने ९७.८०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारली असून,पवार श्रद्धा संतोष: ९७.८० % (प्रथम), करंजकर रोहिणी शरद: ९५.२७ % (द्वितीय) गवळी सिद्धी संतोष: ९३.६० % (तृतीय) तसेच कीर्ती संग्राम धोंडगे (९२%), आनंद प्रमोद पाटील (९१.८०%) आणि समाधान धनाजी बोराडे (९०.८०%) या विद्यार्थ्यांनीही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.विद्यालयातून यावर्षी एस. एस. सी.परीक्षेसाठी एकूण ११५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ११४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये एकूण १०४ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.विशेष प्राविण्यामध्ये ३३ विद्यार्थी,प्रथम श्रेणीत ३५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत २७ विद्यार्थी आणि पास श्रेणीत ०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण प्रेमी नागरिक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages