बेदाणा उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

बेदाणा उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल

 बेदाणा उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा राज्यात बेदाणा उत्पादनात आघाडीवर असून राज्यातील बेदाणा उत्पादनात सुमारे ३६ टक्के वाटा सोलापूर जिल्ह्याचा असून जिल्ह्यातील बेदाणा उत्पादनात माढा तालुक्याचा वाटा सुमारे ३४ टक्के आहे.

यंदा वर्षभर बेदाण्याचे दर चांगले राहण्याचा अंदाज द्राक्ष तज्ञ व कृषी निष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे एक लाख ७० हजार टन बेदाणा उत्पादन झालेले आहे. मागील वर्षी साधारणपणे एवढाच बेदाणा उत्पादित झालेला होता. २०२१-२२ व २०२२-२३ यावर्षीच्या तुलनेत सुमारे एक लाख टन बेदाण्याचे कमी उत्पादन झालेले आहे. सोलापूर जिल्हा हा बेदाणा उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये विजापूर, सोलापूर, तासगाव, सांगली, पंढरपूर या पाच ठिकाणी बेदाण्याची मार्केट आहेत. शिवाय सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष व बेदाणा उत्पादनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. द्राक्षतज्ञ नितीन कापसे यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये सुमारे चार लाख हेक्टरवर द्राक्ष लागवड होते. त्यापैकी साधारणपणे ७२ टक्के द्राक्षे ही थेट बाजारात विकली जातात. २४ टक्के द्राक्षे ही बेदाणा निर्मितीसाठी वापरली जातात तर १.५ टक्के द्राक्षांपासून वाईन तयार केली जाते व अर्धा टक्के द्राक्षे ही ज्यूससाठी वापरली जातात.

मागील दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा बेदाणा उत्पादन सुमारे एक लाख टनाने घटलेले आहे या परिसरातील कोल्ड स्टोरेजच्या क्षमतेच्या केवळ ६० टक्के कोल्ड स्टोरेज बेदाण्याने भरलेली आहेत. त्यामुळे बेदाण्यासाठी वर्षभर चांगला दर राहण्याची शक्यता आहे. सध्या बेदाण्याचा दर किलोला २८० रुपयांपासून चारशे रुपयेपर्यंत आहे तर काळा बेदण्याचा किलोला दर २०० ते २८० रुपये असल्याचे नितीन कापसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages