शाहीर भाई विश्वासराव फाटे जयंती उत्साहात; आठवणींना भावपूर्ण उजाळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

शाहीर भाई विश्वासराव फाटे जयंती उत्साहात; आठवणींना भावपूर्ण उजाळा

शाहीर भाई विश्वासराव फाटे जयंती उत्साहात; आठवणींना भावपूर्ण उजाळा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर, समाजप्रबोधनकार आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे भाई विश्वासराव फाटे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त मोहोळ येथे ‘फाटे भाऊंच्या आठवणी आणि गप्पा’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था, मोहोळ, भाई विलास फाटे मित्र मंडळ आणि लोकसेवा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाई विश्वासराव फाटे यांच्या प्रतिमेस राजश्री राजन पाटील व प्रियांका बाळराजे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाहीर राजाभाऊ वाघमारे आणि रजनीताई सुंदरलाल पंडित (गेवराई) यांनी शाहिरी मुजरा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

त्यानंतर प्राचार्य एन. एस. खंदारे यांनी भाई फाटे यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी चित्रफीत सादर केली. यावेळी मोहोळ को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक नंदकुमार मोहिते, डॉ. जयंत गोळवलकर, शाहीर बापू पटेल, प्राचार्य दत्तात्रय काशीद, हसिफ नदाफ, अरविंद शहा, माणिक गावडे, प्रकाश कोळी, सुधाकर काशीद, डॉ. गोविंद पाटील, राजन घाडगे आदी मान्यवरांनी भाई फाटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच डॉ. प्रमोद पाटील, रब्बेसलाम शेख आणि नंदकुमार शिंदे यांनी आपल्या भावना लेखी स्वरूपात पाठवल्या असून त्यांचे वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाला चंद्रकांत फाटे, मनोज मोरे, रंभादेवी गोळवलकर, अनिल गुंड, डॉ. स्वाती कोरे, मंगल गरड, मनोहर गोडसे, उमेश पुराणिक, बापू दळवे, तानाजी चटके, नागनाथ पाथरूट, संदीप गायकवाड, हनुमंत कोकाटे, यशोदा कांबळे, निवृत्ती शिंदे, अर्जुन सीताप यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व फाटे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सागर फाटे, पृथ्वीराज फाटे, रणजीत फाटे, संगीता फाटे, सुयोग फाटे, शिवराज फाटे, डॉ. प्रांजली फाटे, धनराज फाटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रमोद कोरे यांनी केले, तर आभार आकाश फाटे यांनी मानले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages