सलगर वस्ती परिसरात तब्बल 200 झाडांची कत्तल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

सलगर वस्ती परिसरात तब्बल 200 झाडांची कत्तल

 सलगर वस्ती परिसरात तब्बल 200 झाडांची कत्तल


उपमहापौर देवकर यांच्यासह पर्यावरण प्रेमींची मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक 23 मधील सलगर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसापासून सुमारे 200 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात तक्रार केली असता एक ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा हरित लवादासह न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणवादी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी पत्रकार परिषदेत दिली.
         सलगर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोड करण्यात आली असल्याची माहिती आहे. आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली. जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वेसंध्येलास  शहरात सर्वात मोठी वृक्षतोड करण्यात आली असून यामध्ये सुमारे 200 झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बिल्डरांना पर्यावरण रक्षणाचे काही देणं घेणं राहिले नाही. त्यांना सिमेंटचे जंगल उभा करायचा आहे. यामुळे प्रशासनाची भीती राहिली नाही. विनापरवानगी ही वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमध्ये केवळ पर्यावरणाचेच नाही तर वन्यजीवांचेही नुकसान झाले आहे. या झाडांवर खारुताईसह विविध पक्षी यासह वन्यजीवांचा रहिवास होता. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वृक्षतोड झाली असल्याचा आरोप यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि पर्यावरण प्रेमी मनोज देवकर यांनी केला आहे.
        महापालिका तसेच संबंधित इतर विभागांची परवानगी काढण्यात आली नाही.  झाडे तोडून लाकडे एमआयडीसीतील कारखानदारांना पुरवठा करण्याची शक्यता आहे. या विरोधात सोलापुरातील सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र येऊन या विरोधात लढा उभारणार आहोत. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्या पटीने पुन्हा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. सुमारे 30 ते 50 वर्ष वयाची ही झाडे होती ती कोणत्याही स्थितीत तोडता येत नाहीत. संरक्षित झाडे होती. तरीही मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. यामध्ये सुमारे दहा ते पंधरा कोटीचे नुकसान झाले आहे. पर्यावरणाचे नुकसान वेगळेच झाले आहे.
       या प्रकरणात कशासाठी वृक्षरोप तोड करण्यात आली ? या ठिकाणी बांधकाम होत असल्यास बांधकाम परवाना
 तत्काळ महापालिका प्रशासनाने रद्द करावा. संबंधितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
    या वृक्षतोडप्रकरणी महापालिकेत संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये याप्रकरणी तत्काळ कारवाईची सूचना करण्यात येईल, असे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सांगितले.
        या पत्रकार परिषदेस अजित चोहान, अतिश सोनार आदींसह  पर्यावरण प्रेमी उपस्थित.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages