सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2026

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे

 सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे



उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी 
 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बँकेच्या नूतन संचालक मंडळाने एकमताने ही निवड केली.
 
नुकत्याच झालेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झालेल्या नूतन संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपनिबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता बँकेच्या मुख्य कार्यालयातील संचालक मंडळ सभागृहात निवडीची घोषणा केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
यावेळी संचालक पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीष बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, संचालक डॉ. हर्षद डंबळ, सी. ए. आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोंढे, अॅड. मल्लिनाथ शहाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौव्हाण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे उपस्थित होते.
---------
चौकट
नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा बँकेतर्फे सत्कार
 
सोलापूर जनता सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, तुळशीदास गज्जम, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages