भामला तांडा येथील आई-भाया मंदिराचे कळसारोहण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

भामला तांडा येथील आई-भाया मंदिराचे कळसारोहण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न

 भामला तांडा येथील आई-भाया मंदिराचे कळसारोहण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशातील २० कोटी बंजारा समाजाचे आराध्य दैवत लहान पोहरागड माता जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज यांचे संयुक्त मंदिर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील भामला तांडा येथे नव्याने बांधण्यात आले असून त्याचा कळसारोहण कार्यक्रम गुलबर्गा जिल्ह्यातील चौडापूरचे बंजारा संत मुरारजी महाराज व मंदिराचे मुख्य पुजारी बाबू महाराज यांच्या शुभहस्ते भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाप्रसंगी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. भोजराज पवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल कळके, माजी सभापती कल्याणराव पाटील, बोरामणी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, उपसरपंच महादेव पाटील, हरिष शिंदे, उद्योजक देवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी यांचे संयुक्त मंदिर बांधण्याची बंजारा समाजाची परंपरा असून त्याला कळस भेट देण्याचा मान गावातील परगावी सासूरवासीन म्हणून असणाऱ्या मुलीनी देण्याचा असल्याने सर्व मुली गुरूवार दि.०२/०३/२०२६ रोजी गावी आल्या व डोक्यावर कळशी घेऊन पायी अनवाणी चालत मिरवणूकीद्वारे मंदिराला कळस भेट देण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भामला तांड्यातील व सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
कळसारोहण कार्यक्रमानंतर बंजारा भगिनींनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवीच्या भक्तीगितांवर पारंपारिक नृत्य सादर करण्याचा कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. त्यानंतर महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन झाला. सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्नाटकाच्या गदग जिल्ह्यातील बंजारा गायिका सावित्रीबाई राठोड व यादगिरी जिल्ह्यातील बंजारा गायक आकाश चव्हाण यांची भक्तीगीते सादर करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप धोंडीराम राठोड, ग्रा.प. सदस्य विजय चव्हाण, देविदास राठोड, मधुकर चव्हाण, राजेंद्र राठोड, दयानंद जाधव, दयानंद आहे, दगडू चव्हाण, शिवाजी राठोड, सुखदेव पवार, सुरेश राठोड, विठ्ठल महाराज, संजय महाराज, विनोद राठोड, शाम राठोड, राजू चव्हाण, संतोष जाधव, प्रताप चव्हाण, अशोक चव्हाण, विजय जाधव, शिवाजी चव्हाण (नाईक) आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ भामला तांडा मुस्ती येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी यांच्या मंदिराच्या कळसारोहण प्रसंगी भक्तीगीतांवर पारंपारिक बंजारा नृत्य सादर करताना बंजारा भगिनी दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages