प्रा. मित्रगोत्री व भोसले यांचे कार्य
सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे- सपाटे
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- प्रा.डॉ.अरुण मित्रगोत्री व ग्रंथालय परिचर दत्ता भोसले यांनी आपल्या सेवाकाळात संस्थेने सुवर्ण अक्षरांनी लिहावे, असे कार्य केल्याचे मत मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी व्यक्त केले.
मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमधील प्रा. डॉ. अरुण मित्रगोत्री व ग्रंथालय परिचर दत्ता भोसले यांचा निवृत्तीनिमित्त संस्थेच्यावतीने सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस प्रा. महेश माने, खजिनदार महादेव गवळी, संचालक विनायक पाटील, सुरेश पवार ,मुकुंद जाधव, मंगेश जाधव, अशोक चव्हाण, अलका सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन मोटे यांनी केले.
यावेळी तुळजाभवानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत डोके, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, माजी प्राचार्य डॉ.मधुकर पवार, डॉ. अरुण सोनकांबळे,प्रा. डॉ. नागेश गायकवाड,
प्रा. डॉ. राणी मोटे ,प्रा. सचिन चव्हाण , माजी विद्यार्थी हरिभाऊ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त करून प्रा. डॉ .मित्रगोत्री व भोसले यांच्या कार्याचा गुणगौरव केला.तर सत्कारमूर्ती प्रा. डॉ. मित्रगोत्री व भोसले यांनीही मनोगत व्यक्त करून संस्थेप्रतीची आपली कृतज्ञता व्यक्त केली .तसेच मित्रगोत्री यांनी यावेळी संस्थेला सात लाख रुपयांची देणगी दिली.या कार्यक्रमास प्राचार्या मंजुश्री पाटील, उषा गोकुळे ,किशोर बनसोडे, नागनाथ नवगिरे, ज्योतिषशास्त्री बाळासाहेब ओहोळ, पत्रकार नंदकुमार येच्चे,जयजित पटवा, दादा सुरवसे, बाई भोसले ,सुरेखा मित्रगोत्री, बाबूराव व्यवहारे, बाबूराव डोंगरे, अरविंद येळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. युवराज सुरवसे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. वाल्मिकी कीर्तिकर यांनी मानले.

No comments:
Post a Comment