शिवालयच्या वतीने शिवछत्रपतींना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

शिवालयच्या वतीने शिवछत्रपतींना अभिवादन

 शिवालयच्या वतीने शिवछत्रपतींना अभिवादन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शिवालय सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्योजक प्रमोद मोरे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी विरोधी पक्षनेते शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, शिवालयचे संस्थापक प्रकाश शिंदे, विकास (मामा) गायकवाड, राजू पुणेकर, निलेश शिंदे, विनोद शिंदे, शिवा कलशेट्टी, महेश पवार, किरण शिंदे, स्वराज्य चव्हाण यांसह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages