छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346 व्या पुण्यतिथी निमित्त शिवछत्रपती रंगभवन चौकातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन! विनम्र अभिवादन करण्यात आले.
शौर्य, धैर्य आणि दूरदृष्टीच्या बळावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले आणि स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करावे.
प्रारंभी शिवछत्रपती रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल करणारे राम जगदाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी मैनाताई साळुंखे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले जिल्हा सचिव लखन पारसे उद्योग उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे समीर शेख राहुल जाधव बालाजी जगदाळे कुमार जगदाळे रेवण खजूरकर आधी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment